Skip to content Skip to footer

मुलांसाठी आर्थिक आणि व्यावहारिक शिक्षणचे महत्व.

फक्त शिक्षणच नाही मुलांना शिकवा आर्थिक व्यवस्थापन

मुलांना आर्थिक शिक्षण आपण कसे देऊ शकतो किंवा मुलांना व्यावहारिक ज्ञान पैशाचं ज्ञान आपण कशा पद्धतीने शिकवू शकतो या विषयावरती आज आपण बोलणार आहे.  जर तुमची मुलं १० वर्ष ते 16 वर्ष किंवा अठरा वर्ष वयाची असतील आणि तुम्हाला त्यांना आर्थिक शिक्षण द्यायचं असेल तर हा ब्लॉग खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे.

आजचा विषय साधा सोपा आहे की तुमच्या घरात तुमची लहान मुलं आहेत आणि त्यांना आपण व्यावहारिक शिक्षण, पैशाचं शिक्षण कसं देऊ शकतो काय होतं की आपण मुलं लहान आहेत म्हणून त्यांच्या हातामध्ये पैसे देत नाही त्यांच्या हातामध्ये व्यवहार देत नाही आणि मग अडचण अशी होते की मुलं जोपर्यंत कमावती होत नाही तो कदाचित त्यांना बचती बद्दल गुंतवणूक बद्दल कशाबद्दल काही माहिती होत नाही. आपण काहीसं पॉकेट मनी वगैरे देतो आणि त्यांना तो फक्त खर्च करायचा आहे एवढंच माहीत असतं आणि त्याच्यामुळे काय होतं जेव्हा ते कमवायला सुरुवात करतात त्या वेळेला त्यांना जेव्हा पगार मिळतो तेव्हा त्यांना असंच वाटतं की आलेले पैसे मी खर्च केले पाहिजेत कारण त्यांना गुंतवणुकीचे बचतीच किंवा पैसे कसे वाढतात त्याचे शिक्षण आपण त्यांना दिलेलेच नसतं तर आपण त्यांना ते कसं देऊ शकतो. उदाहरनार्थ माझ्या मुलगा आहे माझा मुलगा आता दहा वर्षाचा आहे.

child financial education

आता माझा मुलगा दहा वर्षाच्या मागच्या दोन वर्षापासून आमच्या दोघांमध्ये एक डील ठरलय की आता मी त्याचा पर डे पॉकेटमनी २० रुपये केले तर मागच्या दोन वर्षांपूर्वी त्याचं मी दहा रुपयांनी पॉकेट मध्ये सुरू केलं होतं. मी त्याला सांगितलं तुझे दहा रुपये रोज तुला मिळणार तू त्याचा हिशोब ठेवायचा तू त्या पैशांचं काय घेतलं काय केलं हे मला तू सांगायचं किती माझ्याकडून पैसे आले किती नाही आले तसं व्यवहार तुझ्याकडे ठेवायचा काही विकत घेऊ शकतो खेळायला विकत घेऊ शकतो चॉकलेट विकत घेऊ शकतो तू काहीही खर्च करू शकतो. तुला जे हवं ते तु घेऊ शकतो फक्त एकच अट की तू पाचशे रुपयापर्यंत जे काही तुला खेळणं घ्यायचंय जे काय करायचं ते तुझे तो पैसे जमा करून ते विकत घ्यायचं.

 त्याच्यामुळे झालं असं की त्याला जेव्हा दहा रुपये व्यवहार त्याच्या हातामध्ये आला दहा रुपयाचे तो काहीही करू शकत होता आणि मग त्यांनी ते जेव्हा सुरुवातीला पैसे मिळाले तेव्हा त्यांनी ते खर्चयला सुरुवात केली कुठे चॉकलेट घे कुठे icecream घे अशा पद्धतीने खर्च केले. अचानक त्याला कुठेतरी आम्ही मॉलमध्ये गेलो तर त्याला खेळणे घ्यायचं त्याची किंमत एक 300, 500 रुपये च्या दरम्यान काहीतरी असेल आणि तो मला बोलायचं कि  ते खेळण मला हवे तर मी त्याला सांगितलं की बाबा रे मी तुला महिन्याला दररोज दहा रुपये म्हणजे महिना तीनशे रुपये देतो तुला तुझी बचत करावी लागेल आणि मग ते तुला खेळणं घेता येईल.

 मग त्याला ती गोष्ट मी लगेच जर घेऊन दिली असती तर तो पुढच्या वेळेस मला ते मागायला लागतात आणि त्याला ते समजलं नसतं. मग त्यांनी काय केला १०-१० रुपये जमवायला सुरुवात केली त्याचं हिशोब व्यवस्थित ठेवायला सुरुवात केली एक त्याचं अकाउंट बुक तयार झालं आणि मग त्याच्याकडे 500 रुपये जमा झाल्यानंतर त्यांनी ती गोष्ट विकत घेतली. मग आमची डील ठरली कि पाचशे रुपयाची वरची जर वस्तू कोणी तू विकत घेत असेल तर 20% कॉन्ट्रीब्युशन त्यांनी द्याचा त्याला जे हवंय त्याच्यासाठी अशा पद्धतीची आमची डील होती तर तू छान पद्धतीने पैसे ह्याचा हिशोब करतो. छान पद्धतीने त्याला जर काही खर्च करायचा असेल तर तो विचार करतो की यार मला याच्यातून काय घ्यायचे त्याचे टार्गेट्स ठरवतो की आता मला त्यांनी मध्ये दोन हजार रुपयांचा त्याला काही तरी बंदूक विकत घ्यायची होती तर त्यांनी तसं टार्गेट बनवलं त्यांनी ते achieve करायला सुरुवात केली .अशा पद्धतीने सुरू झाले आता मी त्याचा लास्ट दोन महिन्यापासून त्याची जी इन्क्रिमेंट आहे पॉकेट मध्ये किती 20 रुपये केली आहे. दहा रुपयाची वीस रुपये केलेत आणि मी त्याला OneIdiot नावाची मूवी दाखवली तुम्ही पण तुमच्या मुलाला youtube वरती अवेलेबल वन इडियट तर ही मूवी नक्की दाखवा त्याच्यामध्ये एक लहान मुलगा बचत करून खूप मोठी रक्कम बनवतो आणि कसं त्याचं भविष्य बनतं असं त्या स्टोरीचं रूप आहे.

तर नक्की तुम्ही तुमच्या मुलाला पण दाखवा. आता मी त्याला ती मूवी दाखवली त्याला सांगितलं की आता तू तुझं पगार मी डबल केला किंवा तुझं पॉकेट मनी मी डबल केलं तर तू ही मूवी बघ आणि तो मुलगा जो आहे हा मूवी मधला तुला त्याच्यासारखा विचार करायचा किंवा त्याच्यासारखं गुंतवणूक करायच्या मग आता त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी पहिलं तर तीनशे रुपये मी त्याला सांगितलं होतं टाकायला सुरुवात कर पण त्यांनी 500 रुपये SIP मध्ये टाकायला सुरुवात केलेली आहे आणि तो म्हटलं की मी शंभर रुपयांमध्ये माझ पॉकेट मनी भागवेल . तर मित्रानो काय होतंय ते पैसे तो गुंतवताना पाहतोय,   गुंतवल्या नंतर ते वाढताना पाहिलं आणि मग त्याला ती सवय लागेल. त्याला कोणतीही गोष्ट घ्याची असेल तेव्हा माझाकडे हट्ट करण्याऐवजी  मम्मी कडे हट्ट करण्या ऐवजी

तो स्वतः ची गणित करतो कि मला कुठं खर्च करायचा आहे .

दुसरी गोष्ट त्याचा शिक्षणाचा खर्च किंवा इतर खर्च तर आपण बघतच असतो. पण त्याची जी काही इच्छा आहे त्याला त्याच्या पैशांतून खर्च करण्याची सवय लावली पाहिजेल . त्याच्या मूळ काय होणार आहे त्याचा आर्थिक शिक्षण , व्यावहारिक शिक्षण पूर्ण होणार आहे. हा जो काय फण्डा वापरला आहे . तुम्ही सुद्दा  तुमच्या मुलांसाठी वापरू शकता . मुलाच वय काय आहे . त्यानुसार तुम्ही त्याचं एक अंदाज घेऊ शकता त्याला पॉकेट मनी किती दिले पाहिजे त्याला गुंतवणुकीसाठी बचतीसाठी मोटिवेट केलं पाहिजे की तुम्ही जर का काहीही कचरा गोळा करत राहिलास तर काय होणार आहे.

तुला जे काही मोठ्या गोष्टी घ्यायच्यात किंवा जे काही तु तुझे स्वप्न आहे ते तुला पूर्ण करता येणार नाहीये. याच्यामुळे त्यांची ती सवय खूप चांगली डेव्हलप होते असं मला वाटतं तर हा फंडा मी माझ्या मुलासाठी वापरलेला आहे आणि मला वाटतं की तुम्ही तुमच्या मुलासाठी विचार करू शकला तर मुलगा दहावीला असेल तर त्यानुसार त्यांना हजार रुपये करा किंवा पंधराशे रुपये महिन्याला करा आणि मग त्याला ती सवय लावा की त्याला ज्या काही गोष्टी घ्यायच्या त्यासाठी डायरेक्टली आपण पैसे दिले तर त्यांना वाटतं की आई-वडिलांकडे खूप पैसे आहेत आणि नाही दिले तर ते नाराज होतात दुःखी होतात, रडतात, ओरडतात या सगळ्या गोष्टींपासून पण वाचाल आणि त्याला एक व्यावहारिक ज्ञान तुम्ही देऊ शकाल मला असं वाटतं की हे नक्की तुम्ही अप्लाय कराल जर तुम्हाला हा ब्लॉग आवडलाय आणि तुमचे मित्र आहेत नातेवाईक आहेत त्यांची सुद्धा लहान मुले त्यांना सुद्धा आर्थिक शिक्षण देणे गरजेचे आहे त्या लोकांना हा ब्लॉग नक्की शेअर करा तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग त्यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की या ब्लॉग बद्दलचं मत तुमचं लिहा.

Leave a comment