
घर कधी घ्यावे आणि कधी घेऊ नये | एकदा हे वाचाच !
घर विकत घेण्याअगोदर एकदा हा लेख संपूर्ण जरूर वाचा.
घर विकत घ्यावे का नाही ?
मिंत्रानो घर हि आपल्या समाजाची भावनिक गरज आहे. घर स्वतःचे असेल तर समाजात पत / मान मिळतो. अशी काहीशी मानसिकता घर नाही अश्या लोकांची पाहायला मिळते. घर घेणे हि जीवनातील फार मोठी अचिव्हमेंट मानली जाते. परंतु घर कधी व कसे घेतले पाहिजे हे खरे पाहता समजून घेणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्याला फार मोठ्या आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. घर घेण्याचा एक निर्णय जर चुकला तर जीवन त्रास होऊ शकते.
घराच्या किंमती दिवसेन दिवस वाढत जात आहेत व भविष्यात त्या वाढत जातील त्या मुले घर जेव्हढ्या लवकर घेता येईल तेवढ्या लवकर घेण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करतांना दिसतो. ज्याला घर नाही तो घर विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे ठीक आहे परंतु ज्या लोकनाकडे राहण्यासाठी घर आहे तो हि गुंतवणुकीसाठी घर घेण्याची धडपड करत आहे.
घर घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने खालील गोष्टी समजून उमजून घर घावे.
१. घराच्या किंमती वाढत जातात ?
मागणी आणि पुरवठा हा अर्थ शास्त्रातील फार महत्वाचा नियम आहे. मागणी जास्त किंमत जास्त; पुरवठा जास्त किंमत कमी. हे सर्वाना माहित आहे. परंतु याचा विचार करून किती लोक आज घरे विकत घेत आहेत ? याचा विचार करायला पाहिजे कि घराची मागणी जास्त आहे का पुरवठा जास्त आहे ?
२. घर घेण्यासाठी कोण मागणी करते ?
आज मी पुणे किंवा पिंपरी चिंचवडचा विचार केला तर ( बाकी शहरात हि हेच लागू आहे) घरांना मागणी करणारे दोन गट आहेत.
- ज्याला राहायला घर हवे आहे तो घराची मागणी करतांना दिसतो.(end user )
- ज्याला घरामध्ये गुंतवणूक करायची आहे ( Investor गुंतणूकदार )
आत्ता आपण या पुढील काळात कोण मागणी करेल. याचा विचार करू.
गुंतवणूकदार
गुंतवणूकदार मागणी वाढवेल का ? तर याचे उत्तर शोधावे लागेल. समजा मी आज गुंवणूक म्हणून एक फ्लॅट चिंचवड मध्ये विकत घेतला. तर एक BHK मला साधारण पाने ३५०००००/- ला मिळेल. पस्तीस लाख गुतंवणूक करतांना मला दोन अपेक्षा आहेत एक भाडे मिळावे दुसरी घराची किंमत वाढावी. पस्तीस लाखाच्या फ्लॅट ला आज पिंपरी चिंचवड मध्ये ८-१० हजार भाडे मिळेल. मी १० हजार भाडे मिळेल असे गृहीत धरले तरी वार्षिक एक लाख वीस हजार मला भाडे मिळेल. ३५ लाख गुंतवणुकीला १.२० हजार परतवा मिळाला. तर मला ३५ लाख गुंतवणुकीला किती व्याज मिळालं. १२००००/३५०००००* १००= ३. ४२%
म्हणजे मला माझ्या गुंतवणुकीवर फक्त ३.५% व्याज मिळालं. मी जर हा फ्लॅट घेतला नसता आणि हे पैसे मी बँकेत ठेवले असते तर मला साधारण बँकेने वार्षिक ७% व्याज दिले असते. म्हणजे मी साधारण पने -३.५% रिटर्न मिळवले. म्हणजे भाड्याच्या उत्पन्ना साठी फ्लॅट घेणे हि माझी मोठी चूक ठरू शकते.
परंतु जर त्या फ्लॅटची किंमत ३.५% वर्षाला वाढली तर मात्र मी मार्केट च्या ( बँकेच्या ) व्याजाला मॅच करेल. मग मी आज आसा विचार केला कि मागील ५ वर्षात वर्षाला फ्लॅटची किंमत दीड लाखाने वाढली आहे का ? तर याचे उत्तर नाही असे आहे. उलट मागील ५ वर्षात किमती कमी झालेल्या आहेत.
थोडक्यात काय तर गुंतवणूक म्हणून फ्लॅट / घर घेणे शहाणपण नाही. म्हणजे गुंतवणूकदार पुढील काही वर्ष घराला मागणी वाढवेल असे दिसत नाही.
राहण्यासाठी घराची मागणी पुढील काळात वाढेल का ?
राहण्यासाठी घराची मागणी करणारे दोन गट आहेत.
एक जो घर विकत घेऊ शकतो. ज्याचा पगार घर घेण्यासाठी पुरेसा आहे.
दुसरा जो घराची मागणी करू शकतो परंतु त्याचा पगार घर घेण्यासाठी पुरेसा नाही.
आत्ता आपण पहिल्या गटाचा विचार केला. जो घर घेऊ शकतो. घर घेण्यासाठी पगार पुरेसा आहे. हि व्यक्ती जी घर विकत घेऊ शकते ती आज घर घेण्याची राहिली आहे का ? म्हणजे ज्या लोकांची घर विकत घेण्याची ताकत ( ऐपत ) होती त्यांनी आगोदरच घर घेऊन टाकली आहेत. ते लोक आत्ता पुणे पिंपरी चिंचवड मध्ये फार कमी आहेत. या लोकांन कडून फार मागणी वाढण्याचे चान्स फार कमी आहेत.
दुसरा जो घर घेऊ शकत नाही. पगार कमी आहे. हा व्यक्ती येणाऱ्या काळात मागणी वाढवू शकतो का? या व्यक्तीचा पगार रातोरात डबल व्हावा लागेल मग हा मागणी वाढवेल. म्हणजे ज्या व्यक्तीचे उत्पन्न ३० हजार आहे तो ३५ लाखाचा फ्लॅट घेऊ शकत नाही. आणि त्याचा पगार पुढील ५ वर्षात डबल होत नाही.
वरील विवंचनेने हे तरी लक्षात घेतले पाहिजे कि येत्या काळात घर घेण्यासाठी मोठी मागणी येणे अपेक्षित नाही.
घरांचा पुरवठा पुढील काळात कसा असेल ?
सरकार जण घर योजने अंतरंगात सर्वाना घरे २०२२ पर्यंत देण्याच्या गोष्टी करत आहेत. त्या साठी त्यांनी कसून तयारी केलेली दिसत आहे. रेरा पास करून बिल्डर वर घरे वेळेत बांधून देण्याची सक्तीच केली आहे. दुसरे कमी उत्पन्न गटाला घर घेण्यासाठी व्याजात सूट देत आहेत. ठराविक स्क्वेअर मीटर पर्यंत जर बिल्डर घरे बाधत असेल तर त्याच्च ३५% कर सरकारने कमी केला आहे. म्हणजे या अगोदरचे फ्लॅट स्वतःत विकणे बिल्डरला कदाचित परवडणार नाही परंतु जण घर योजने आतंरगत जे बिल्डर घरे बांधत आहेत त्यांना मात्र घरे कमी किंमतीत विकणे परवडू शकते.
पुरवठा कोण कोण करत आहे.
१. सरकार म्हाडा सारख्या योजना राबवून पुरवठा करत आहे.
२. बिल्डर ( मागील वर्षात भारतात रेकॉर्ड ब्रेकिंग गृह योजना मंजूर झाल्या आहेत)
३. गुंतवणूकदार
जे लोक भाड्याने राहत आहेत. त्यांना घर घेण्यासाठी खूप सूट व स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्याची सरकारची तयारी पाहून मला असे वाटते कि भाडेकरू भाडे भरायचे बंद करून स्वतःचे घर घेतील. मग गुंतवणूकदार त्यांनी जे घरे भाडे कमावण्यासाठी घेतली होती ते हि त्यांची घरे विकायला काढतील.
पुढील काळात वरील सर्व मुद्दे गृहीत धरले तर घरांच्या किमती कमी नाही झाल्या तरी वाढणार नक्की नाहीत असे वाटते आणि वाढल्या तरी महागाई पेक्षा जास्त वाढणार नाहीत.
पुढील २० वर्षात घर विकत न घेतल्यास काय होईल ?
१. पुढील वीस वर्ष भाडे भरावे लागेल. दार वर्षी १०% वाढ पकडून खालील प्रमाणे.
हे गणित फोटो मध्ये खाली दिले आहे.
म्हणजे आपले ७० लाख भाडे जाऊ शकेल. घर हि आपले नाही आणि ७० लाख नुकसान म्हणजे घर घेतलेलं चांगले असे वाटू शकते.
३५ लाखाचा फ्लॅट विकत घेतला तर
१० लाख डाऊन पेमेंट करावे लागेल.
२५ लाख कर्ज काढावे लागेल त्याला १०% वार्षिक व्याजाने २४१२५/- मासिक हप्ता भरावा लागेल. म्हणजे साधारण पाने २५ लाखाच्या कारंजा साठी ६० लाख मोजावे लागतील. घराचा ३०००/- मासिक खर्च जसे कि सोसायटी; पाणी पट्टी; घर पट्टी इ येईल.
घर न घेता भाड्याने राहिल्यास
१० लाख डाऊन पेमेंट गुंतवण्याची संधी मिळेल. १० लाख म्युच्युअल फंडात ठेवले तर त्या १० लाखाचे वार्षिक १५% व्याजाने २० वर्षात साधारण १कोटी ८० लाख बनतील.
महिना हप्त्याचे २४००००/- वाचतील त्या पैकी १००००/- भाडे म्हणून जरी भरले व वाचलेले १४०००/- SIP मध्ये टाकले तर २० वर्षात १५% परताव्याने त्याचे हि १ कोटी ८० लाख बनतील.
म्हणजे भाडे भरून हि आपल्या कडे २० वर्षा नंतर साधारण ३ कोटी ५० लाख असतील. या काळात घराची किंमत वाढेल असे गृहीत धरले तरी ३५ लाखाच्या घराची किंमत ६% वार्षिक वाढ पकडली तर १ कोटी २० लाख होईल.
साडेतीन कोटी मधून जरी आपण सव्वा कोटीचे घर घेतले तर आपल्या कडे साधारण २ ते सव्वादोन कोटी शिल्लक राहतील. या सव्वा दोन कोटी मधून तुम्ही भाड्याचे ७० लाख वजा केले तरी नेट फायदा दीड कोटी असेल.
We have upcoming Free Workshop Schedule on financial Literacy Importance Feel free to Join us!
#financialplanning #financialadvior #investor #newhome #EMI #moneyinvestment#financialsecurity #moneyacademy #pune #mutualfund