
डेट म्युच्युअल फंड ( बँकेपेक्षा जास्त व्याज व कर बचत या पर्यासाठी वापरू शकता )
डेट म्युच्युअल फंड प्रामुख्याने सरकारी बॉण्ड आणि कंपन्यांच्या डेबेचर मध्ये गुंतवणूक करतात. सरकारी बॉण्ड मध्ये पैसे बुडण्याचा किंवा परतावा न मिळण्याचा धोका नाही. कंपन्यांच्या डेबेचर हे क्रिडिट रेटिंग AAA ; AA +; AA- ; असे असते. जास्त चांगले क्रिडिट रेटिंग हे सुरक्षितता जास्त असण्याचे प्रतीक आहे.
आपण बँकेत फिक्स डिपॉझिट ठेवण्या पेक्षा आपल्या आवडत्या बँकेच्या म्युच्युअल फंडात ( FMP फिक्स मॅच्युरिटी प्लॅन ) पैसे ठेऊ शकता. तुम्हाला बँक फिक्स डिपॉझिट पेक्षा १-२% जास्त व्याज मिळू शकते. त्याच बरोबर तुम्ही कर बचत करू शकता.
उदाहरण
तुम्ही १ लाख रुपये बँकेत FD केले व बँकेने तुम्हाला ७% वार्षिक व्याज दिले . तर तीन वर्षात तुम्हाला २१% व्याज मिळेल व तुम्ही ज्या टॅक्स स्लॅब मध्ये येता त्या प्रमाणे तुमचा टॅक्स भरावा लागेल. (बँक तुमचा TDS कापून घेते ). म्हणजे जर तुम्ही १०% टॅक्स स्लॅब मध्ये येत असाल तर २१% कॅपिटल गेन ला २.१ % टॅक्स भरावा लागेल. जर २०% टॅक्स स्लॅब मध्ये येत असाल तर ४.२% टॅक्स भरावा लागेल. जर ३०% टॅक्स स्लॅब मध्ये येत असाल तर ६.३% टॅक्स भरावा लागेल. ( हा कर वाचवण्याचे मार्ग आसू शकतात. परंतु ढोबळ मनाने आपल्याला हा टॅक्स भरावा लागतो.)
परंतु आपण जर म्युच्युअल फंड च्या डेट फंड मध्ये गुंतवणूक केली व त्या योजनेमध्ये हि आपल्याला ७% परतावा मिळाला तर तीन वर्षात आपला कॅपिटल गेन २१% होईल परंतु आपण इंडेक्शेशन वापरू शकतो. टॅक्स वाचवण्याचा फिक्स उत्पन्न प्रकारात हा फार चांगला मार्ग आहे. इंडेक्शेशन म्हणजे काय ? तर तुमच्या कॅपिटल गेन मधून मागील तीन वर्षाची महागाई वजा करून राहिलेल्या रक्कमेवर टॅक्स भरणे होय.
समजा मागील तीन वर्षात पहिल्या वर्षी ६% दुसऱ्या वर्षी ७% व तिसऱ्या वर्षी ६% महागाई वाढली तर तीन वर्षात मिळून १९% महागाई होईल. हे १९% तुमच्या म्युच्युअल फंड मधून २१% झालेल्या कॅपिटल गेन मधून वजा होतील. तुम्हाला फक्त २१%-१९%=५% एवढ्याच रक्कमेवर टॅक्स भरावा लागेल.
म्हणजे बँकेत झालेल्या संपूर्ण फायद्यावर टॅक्स भरावा लागेल तर म्युच्युअल फंडातून झालेल्या फायद्यावर इंडेक्शेशन वजा करून टॅक्स भरावा लागेल.
मासिक व्याज मिळवणारा साठी कर बचत.
आपण बँकेत १ लाख गुंतवणूक केली व महिन्याला व्याज घेतले तर सर्व करयुक्त असेल. म्हणेज तुम्हाला त्या वर कर भरावा लागेल. परंतु तुम्ही जर म्युच्युअल फंडात पैसे टाकले व महिन्याला व्याज घेतले तर फार कमी कर भरावा लागेल.
बँकेच्या व्याजावर जाणारा टॅक्स रुपया मध्ये खालील प्रमाणे.
BANK FD | INTAREST | MONTHLAY | 10% TAX | 20% TAX | 30% TAX |
100000 | 7% | 583 | 58.3 | 116.6 | 176.9 |
वरील उदाहरणा नुसार आपल्याला बँकेत मिळणाऱ्या संपूर्ण व्याजावर कर भरावा लागतो. कारण आपण बँकेला फिक्स डिपॉझिट दिले आहे. म्हणजे कर्ज दिले आहे त्या कर्जावर बँक आपल्याला व्याज देत आहे. ते सर्व व्याज आपल्या कर प्रणाली प्रमाणे कॅपिटल गेन म्हणून पहिले जाते. व वरील प्रमाणे ७% परतावा मिळाला तरीही आपल्याला टॅक्स भरावा लागतो.
आत्ता आपण म्युच्युअल फंडाचे पाहू जर आपल्याला ७% परतावा म्युच्युअल फंडात मिळाला. तो परतावा आपण महिन्याला काढून घेतला तर किती टॅक्स भरावा लागेल ?
MF | INTAREST | MONTHLAY | 10% TAX | 20% TAX | 30% TAX |
100000 | 7% | 583 | 0.33 | 0.66 | 0.99 |
म्हणजे बँकेच्या तुलनेत फारच कमी टॅक्स आपल्याला भरावा लागेल. असे का होते ? कारण जेव्हा आपण म्युच्युअल फंडात पैसे टाकतो तेव्हा आपण म्युच्युअल फंडाला कर्ज देत नाही तर आपण त्याचे युनिट विकत घेतो. ( त्याचे भाग विकत घेतो. ) त्या युनिटची आपण किंमत देतो. त्या किंमतीला NAV (नेट असेट व्हॅल्यू ) म्हणतात. समजा आपण एका म्युच्युअल फंड स्कीम मध्ये १०००००/- रुपये टाकले. समजा त्या स्कीमचा NAV १० रुपये आहे. तर आपल्याला त्या स्कीमचे १०००० युनिट मिळतील. एका महिन्यात त्या स्कीम ने वार्षिक ७% परतावा दिला तर आपले ५८३.३ रुपये वाढतील. म्हणजे आपल्या प्रत्येक युनिटची किंमत .०६ पैसे वाढेल व तो युनिटचा NAV १०.०६ होईल . आत्ता आपण जर ते काढून घ्यायचे ठरवले तर प्रत्येक युनिटचे ०. ०६ पैसे आपल्याला काढता येत नाहीत. जर आपल्याला ५८३. ३ पैसे काढायचे असतील तर आपल्याला ५८ युनिट विकावी लागतील. म्हणजे आपल्याला ५८३. ३ पैसे मिळतील. ५८*१०. ०६ = ५८३. ३. आत्ता या प्रकरणात आपले ५८ युनिट जे विकले त्याचे १० प्रमाणे आपण आगोदर पैसे दिले होते. म्हणजे आपलेच ५८० रुपये परत आले व फक्त ३.३ रुपये कॅपिटल गेन झाला.म्हणून आपल्याला फक्त ३. ३ रुपयावर टॅक्स भरावा लागेल. जो वरील तक्त्यात दाखवला आहे.
समजले नसेल तर साधे उदाहरण देतो. समजा आपण बँकेत १०० रुपये भरले व बँकेने आपल्याला एका महिन्यात १० रुपये व्याज दिले. तर १० रुपये हा कॅपिटल गेन पकडण्यात येईल व आपल्याला संपूर्ण १० रुपयावर टॅक्स भरावा लागेल. परंतु आपण १०० रुपये बँकेत न ठेवता त्याचे १० रुपये एक असे दहा पेन विकत घेतले. एका महिन्यात त्या एका पेनाची किंमत ११ रुपये झाली. आत्ता तुम्हाला १० रुपये काढून घ्यायचे आहेत मग तुम्हाला प्रत्येक पेनचा वाढलेला एक एक रुपया काढून घेता येईल का ? तर नाही तुम्हाला एक पेन विकावा लागेल. मग तुम्हाला ११ रुपये मिळतील. मग तुम्ही जो पेन विकला त्या पेन मध्ये तुमची प्रिन्सिपल १० रुपये होती व फक्त १ रुपया तुम्हाला कॅपिटल गेन झाला. मग एका रुपयावर टॅक्स भरायचा.
कर बचत व १-२% जादा व्याज बचतीसाठी खालील लिंकवर जाऊन गुंतवणूक करा. किंवा अधिक माहिती साठी आमच्या कार्यक्रमाला.
तुम्ही डायरेक्ट आर्थिक साक्षरता या कार्यक्रमाला येऊ शकता. किंवा फ्री डेमो साठी नाव नोंदवू शकता.
फ्री डेमो साठी खालील लिंक वर क्लिक करा.