पेन्शन प्लान
मित्रांनो आपण रिटरमेंट बद्दल हमेशा टेन्शन मध्ये असतो. कमाई बंद झाल्यावर मुले सांभाळतील का ? आपले कसे
होणार ? इत्यादी प्रश्न आपल्याला भेडसावत असतात. परंतु या प्रश्नाचे उत्तर काही केल्या सापडत नाही. मग तुम्ही
काय करता एखादा जीवन विमा सल्लागार पकडता किंवा तो तुम्हाला पकडतो. आणि तुम्ही महिन्याला आमुक एक
रक्कम गुंतवा तुम्हाला २० वर्षाने आमुक आमुक रक्कम मरेपर्यंत मिळेल. तुम्ही मग फारसा विचार न करता ती
पॉलिसी काढता. परंतु २० वर्षां नंतर जी काही रक्कम त्या सल्ला गराने तुम्हाला सांगितली आहे. तिचे त्या वेळी काय
किंमत असेल याचा साधा विचार सुद्धा करत नाही. आजचे ३० हजार ज्या गोष्टी विकत घेऊ शकतात ते ३० हजार
वीस वर्षाने किती गोष्टी विकत घेऊ शकतील. तुमच्या गुंतवणुकीला परतावा किती मिळतो ? तर जीवन विमा काढला
तर फार तर फार ४-७% आणि महागाई विचारात घेतली तर लक्षात येईल कि कदाचित रक्कमेचा आकडा मोठा होतो
परंतु खरेदीशक्ती कमी होत जाते.
तुम्हाला जर खरोखर चांगली पेन्शन पाहिजे आहे तर तुम्ही नियमाने स्वतःवर कंट्रोल ठेऊन जर गुंतवणूक करणार
असाल तर खालील पर्याय वापरा. महिना १०८७१ रुपये महिन्याला SIP करा. तुम्हाला वार्षिक १२% परतावा मिळाला
तर २० वर्षात तुमच्याकडे १०००००००/- ( एक कोटी) जमा होतील.
होणारी रक्कम 10,000,000
वर्ष SIP 20
वार्षिक व्याज 12%
महिना बचत SIP 10,871
महिना ७५३५/- रुपये महिन्याला SIP करा. तुम्हाला वार्षिक १५% परतावा मिळाला तर २० वर्षात तुमच्याकडे
१०००००००/- ( एक कोटी) जमा होतील.
होणारी रक्कम 10,000,000
वर्ष SIP 20
वार्षिक व्याज 15%
महिना बचत SIP 7,535
महिना १३८१२/- रुपये महिन्याला SIP करा. तुम्हाला वार्षिक १०% परतावा मिळाला तर २० वर्षात तुमच्याकडे
१०००००००/- ( एक कोटी) जमा होतील.
होणारी रक्कम 10,000,000
वर्ष SIP 20
वार्षिक व्याज 10%
महिना बचत SIP 13,812
वरील एक कोटी वार्षिक ६% परतावा देणाऱ्या कोणत्याही गुंतवणूक पर्याया मध्ये टाका. महिन्याला पेन्शन म्हणून
२० वर्ष ५९७०२/- रुपये घ्या. २० वर्ष नंतर तुमच्या कडे पन्नास लाख शिल्लक असतील.
SIP रक्कम २० वर्षाने 10,000,000
वर्ष पेन्शन SWP 20
वार्षिक व्याज 6%
२० वर्षाने शिल्लक 5,000,000
महिना पेन्शन SWP 59,702
वरील एक कोटी वार्षिक ६% परतावा देणाऱ्या कोणत्याही गुंतवणूक पर्याया मध्ये टाका. महिन्याला पेन्शन म्हणून
२० वर्ष ४८६७६/- रुपये घ्या. २० वर्ष नंतर तुमच्या कडे एक कोटी शिल्लक असतील.
SIP रक्कम २० वर्षाने 10,000,000
वर्ष पेन्शन SWP 20
वार्षिक व्याज 6%
२० वर्षाने शिल्लक 10,000,000
महिना पेन्शन SWP 48,676
माझ्या मते एव्हडा चांगला परतावा तुम्हाला कुठेच मिळू शकणार नाही. त्या मुले तुम्ही निश्चिंत होऊन गुंतवणूक
केली पाहिजे. जे लोक तुम्हाला खात्रीशीर परताव्याची गॅरंटी देतात ते सुद्धा तुमचे पैसे शेअर आणि बॉण्ड मध्ये
गुंतवतात. परंतु जो परतावा ते खात्रीशीर देतात तो फार फार कमी आहे. करण्यासाठी तुम्हाला थोडी चिकाटी
दाखवावी लागेल. पैसे थोडे फार मार्केट मुले कमी जास्त होतील. परंतु तुम्ही योग्य गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने
तुमचे उद्दिष्ट पूर्ण करू शकता. अधिक माहिती साठी आपण आम्हाला संपर्क करू शकता.
To Know About Our upcoming Free wealth Creation Workshop in Pune – kindly contact
91-91753 58136
To Your Sucess,
Akash Ghondawale, Money Academy
91-91753 58136
https://themoneyacademy.in/