लग्न जमवताना ( खास करून मुलीकडील वडीलधाऱ्या लोकांच्या )
अपेक्षा
१. कर्तृत्ववान असावा
२. वेलसेटल असावा
३. चांगला पगार असावा ( व्यावसायिक नको )
४. स्वतःचे घर असावे
५. गाडी असावी
६. घरात सर्व सुख सुविधा असाव्यात इ.
मुलाचे लग्न वय आपल्याकडे २१ ते ३० आहे. शिक्षण व नोकरी किंवा व्यवसाय सुरु होण्याचं वय आणि याच काळात लग्न करणे गरजेचे आहे. आई वडिलांनी घर गाडी घेतलेली असेल तर ठीक नसेल तर या २१-३० वर्षयाच्या मुलाला स्वकमाईवर घर,गाडी, इ. सुख सुविधा घेऊन सेटल होणे कितपत शक्य आहे ???? मुलगी चांगली हवी तर हे सर्व हवं आणि मग एक दृष्टचक्र सुरु होते. (emi) हप्ता. वरील गोष्टी घेण्यासाठी मग हा मुलगा जितकी जमतील तेवढि कर्ज काढतो. एकही पैसा सेविंग किंवा गुंतवणुकीत ठेवत नाही. लग्न होते तेही पर्सनल किंवा क्रेडिटकार्ड वापरून. तुम्हाला वाटते तुम्ही वरील सर्व गोष्टी पाहून मुलीचं लग्न केले आहे मुलगी आनंदात जगेल. परंतु तुम्ही हे सर्व पाहून लग्न करणे मुलीच्या भविष्यासाठी शाप ठरत आहे. कारण मुलाची कर्जे हि १०-२० वर्षाची असतात ६०-७०% पगार हा हप्ते भरण्यासाठी जात असतो. आणि ना मग हौस ना मौज फक्त EMI.
मी आकाश गोंदवले- आर्थिक कोच, मागील ५-६ वर्षांपासून या दृष्टचक्रात अडकल्याना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा मी त्यांचे आर्थिक नियोजन करतो तेव्हा मला दोघेही कर्जाच्या जाचाला प्रचंड वैतागलेले दिसतात. वरील सर्व फक्त एक चांगली मुलगी लग्नाला मिळावी म्हणून केलेलं आहे हे समजते. त्या मुलाकडे खूप चांगल्या व्यावसायिक नवनवीन कल्पना आहेत व त्या जर अमलात आणल्या तर लाखो करोडो रुपये हा मुलगा काही वर्षात कमावेल असे वाटते परंतु तो त्या कल्पना आमलात आणूच शकत नाही कारण EMI. जो व्यावसायिक होऊन करोडो कमावू शकत होता रोजगार निर्मिती करू शकत होता तो फक्त लग्नासाठी म्हणून घेतलेल्या गोष्टीसाठी जीवनभर हप्ते फेडत दुःख कष्टात घालवतो.
मी ही व्यावसायिक होतो घर, गाडी, सुख-सुविधा माझ्याकडे नव्हत्या. त्या घेणे मला शक्य सुद्धा नव्हते कारण माझ्याकडे नोकरी नव्हती म्हणजे अर्थातच मला बँक कर्ज देत नव्हती. परंतु माझ्याकडे बचत होती गुंतवणूक होती आणि मला माझ्या गुंतवणुकीतून खूप चांगला परतावा मिळत होता. माझे लग्न करायचे होते तेव्हा मी टेलरिंग व्यवसाय करत होतो. भाड्याचे दुकान होते. मला माझे कोणीही नातेवाईक मध्यस्थी किंवा मुलगी देण्यास तयार नव्हते. खूप ठिकाणावरून हिणवणी आणि अपमान सहन करावा लागला. मला कोणी तुझ्याकडे गुंतवणूक किती आहे माझे भविष्यातले प्लॅन काय आहेत. ते प्लॅन मी अस्तीत्वात कशे आणणार आहे. आणि कर्ज नसणे किती फायद्याचे आहे या पैकी कोणताच प्रश्न विचारला नाही. त्यांनी विचारला घर;गाडी; सुविधा; नोकरी आहे का ? अर्थातच ते माझ्याकडे नव्हतं. म्हणजे मला लग्न किंवा मुलीच्या बाबतीत आडजेस्टमेंट करावी लागणार होती आणि ती मी केलीही.
पुढे ५-६वर्षात गुंतवणुकी वाढत गेल्या पुढे टेलरिंग व्यवसाय बंद करून मी फक्त गुंतवणुकीच्या कमाईवर जगू लागलो अर्थात गुंतवणुकीतून येणारी कमाई ही ज्या मुलीकडच्यांनी मला नकार दिला होता त्याच्या जावयाच्या पगार पेक्षा २-३ पट होती. घरात हौस मौज फिरणे; हॉटेलिंग; धमाल सुरु होती. कारण पैसे जाण्याच्या वाट नव्हत्या आणि येण्याचा वाटा बऱ्याच होत्या. मुलांच्या शिक्षण; भविष्य याच्या टेन्शन मध्ये जगत आहेत. आज मी माझ्या गुंतवणुकीला कमाईचे साधन केले आणि लोकांना पैशाने पैसा कसा कमावला जातो ते शिकवत आहे. माझ्याकडे पुण्यात ४ घरे व कमर्शियल रियल इस्टेट प्रॉपर्टी आहे. माझ घरातील फर्निचर पुण्यातील प्लॅटच्या किमतीइतके आहे. खूप सारी गुंतवणूक वेगवेगळ्या असेटमध्ये आहे. माझे बरेच व्यवसाय आहेत आणि माझ्याकडे जवळजवळ ३५-४० लोक काम करतात.
हे सर्व लिहिण्याचे कारण एकच आहे. माझ्याकडे आर्थिक साक्षर कार्यक्रमाला तरुण येतात आणि लग्नासाठी घर; घडी घ्यावी लागेल हे सांगतात तेव्हा खूप वाईट वाटते. जे पैसे आणखीन कमाई वाढवून श्रीमंती कडे घेऊन जाऊ शकतात ते पैसे डाऊन पेमेंट साठी खर्च करून EMI सुरु करण्यासाठी जाणार आहेत. मोठे घर; मोठी गाडी हि संपत्ती नाही तर फक्त नोकरी किंवा शारीरिक उत्पनावर त्याचे खर्च भागणार असतील तर तो एक मोठा त्रास आहे. ती एक मोठी लायबिलिटी आहे. जी तुमच्या मुलीला सुखी कधीच करू शकणार नाही.
सर्वाना माझी नम्र विनंती आहे लग्न कोणाशी करावे याचे पॅरामीटर लवकर बदला नाहीतर करोना सारखा एखादा आजार तुमच्या EMI भरणाऱ्या जावई व मुलीच्या जीवनात अंधकार करेल.
तुमचा आकाश गोंदावले
Financial Freedom Coach